आठवणीनिकित्येकदा अख्ख्यारात्री जागवल्या कितीतरी संध्याकाळ बेचैनीत घालवल्या अश्रुनीही नसांगताच पापण्या भिजवल्या,मनाने आठवणी आणखीखोल रुजवल्या"
या आठवणी पण तुझ्या सारख्याच आहे...
कारण यांच्याशिवाय जगन मजसाठी अशक्यच आहे...
जशी बोलण्यात तू मला रात्र रात्र जागवते,
तू नाहीस तर तुझी कमतरता तुझी आठवण भागवते....
तू अन आठवण दोन्ही सायंकाळीच येतात,
दिवसभराचा तन झटक्यात मिटवतात....
अन अश्रुंविषयी बोलूच नये मी...
तू जशी कधी रडते, किव्वा हसतांना आनंदअश्रू ढाळते,
तशीच तुझी आठवण आनंदाची वा रुसव्याची, डोळ्यात पाणी आणते...
मनात माझ्या तुम्ही दोनच वसतात,
तू अन तुझी आठवण दोन्हीही, माझे आयुष्य फुलवतात...
Monday, April 18, 2011
Sunday, April 17, 2011
pl ची कहाणी...
काहीतरी बिनसलंय पण तो काही सांगत नव्हता,
रात्री तर तो विचित्र वागत होता,
आकाशातले ते चंदेरी तारे,
संथ वाहणारे ते गार गार वारे,
कशाकडेच त्याचे लक्ष नव्हते...
मनाच्या कोपर्यात तो रडत होता,
चिंतेचे डोंगर एकाकीच चढत होता...
सकाळीपण काही सुधार न्हवता त्याच्यात
आज तर होत शेवटच lect वर्गात,
pl लागली,
सारे खुश झाले, अभ्यासाला वेळ मिळणार
या रोजच्या कॉलेज life पासून सुटका होणार...
तो मात्र नाराज होता,
कुणाशीच काही बोलत न्हवता,
स्वतःच काहीतरी पुटपुटत होता,
आतून खोलपर्यंत तुटत होता.
परीक्षेला घाबर्नार्यांपैकी तो नव्हता,
कॉलेज कार्नार्यान्पैकीपण तो नव्हता...
मग नेमक प्रोब्लेम तरी काय???
ती...
आता समजल घोड कुठ अडलं ते,
लक्षात आल त्याच गणित कुठ भीडल ते...
pl मध्ये ती दिसणार कशी त्याला???
दिसली नाही ती तर झोप येणार कशी याला???
मोठा यक्ष प्रश्न पुढे आला,
त्यामुळेच तर हा उंट डोंगराखाली आला,,,
lect मध्ये जायचं कारणच ती होती,
साहेबांसाठी पुस्तक अन वहीपण तीच होती...
फोन तरी किती वेळा करू??? प्रश्न मोठा मनात
अहिल्यान्दाच अनुभवल अस बिचार्याने जीवनात...
काय करू कळत नाहीये त्याला,
एक साध कारणही सापडत नाहीये बिचार्याला...
हताश तो झाला , शेवटी वीचार करून थकला,
मन खाली घालून शेवटच्या बेंचवर जाऊन बसला...
तितक्यात...
"मला mis समाजात नाही रे, मदत जरा करशील का?
जास्त नाही पण एक तास रोज येऊन सांगशील का?"
तीन जवळ येऊन स्वतः विचारलं,
त्याच मन ऐकताच क्षणात तरारलं...
अशक्य शक्य झाल होत,
पण हे तिथच थांबल नव्हत...
"नक्कीच, पण मलाही थोडी मदत हवी आहे,
finance मला 40 वर का होएना पण काढायचा आहे"...
त्याने मनुष्य वृत्ती दाखवली,
भेटत ते कमीच हि उक्ती चालवली...
"सांगेन मी finance पण तुलाही practice करावी लागेल,
दोन विषय म्हटल्यावर २ तास तरी भेटाव लागेल"...
तिच्या या उत्तरावर तो फार खुश झाला,
भेटू उद्या म्हणून तो रूम कडे निघाला...
हे सर झाल्यावर ती हलकेच हसली,
म्हटली, "मोहिनीच्या सल्ल्यामुळे मी आज वाचली...
तो नसता दिसला तर मी अभ्यास कसा केला असता?
mis तर mis , माझातर finance पण राहिला असता..."
Saturday, April 16, 2011
"ती" मला सगळीकडे दिसते
हो दिसतेय "ती" मला सगळीकडे,
अन सगळे म्हणतात "तू फार पाहतो सार्या मुलींकडे".
काय करू मी???
कुणीच्या नजरेतून बघते ती,
तर कुणाच्या गालातून हसते ती,
कुणाच्या केसांमध्ये तिची आठवण,
कुणाच्या बोलण्यात तिच्या पद्धतीची साठवण...
कधी उगाचच हक मारतो मागून,
अन कधी कधी येत पण नाही सांगून.
कुणाच्या ओढनीतून उगाच मला चिडवते,
तर कधी सावली बनून माझा रस्ता अडवते...
मी तरी काय करू ? माझी चूक नाही यात
ती अन तीच दिसते मला सगळ्यात...
त्यामुळे डोळे न उघडण्याचा विचार केला,
मनातही तिच्या छबिने तोही गारद केला.
स्वप्न अन सत्य यात जागाच उरली नाही,
मी तरी काय करू "तीन" सोडलेली पोकळी कधीच भरली नाही....
पाऊस
आज चक्क पाऊस पडला,
पण नाही भिजलो आज पावसात,
ती न्हवती, मी तरी काय करणार....
पाऊस हलकेच कानात सांगून गेला
अरे वेड्या एप्रिलमध्ये मी येतोय काहीतरी तर कारण असणार ना,
मी म्हटल खर बाबा तुझ, पण एकता भिजलो तर ती माझ्यावर रुसणार ना...
या वाक्यावर तो हसला अन उत्तरला,
तिथ तीही हेच म्हणाली,
अन तुमच्या या दुराव्यात,
माझीपण भिजायची इच्छा कोरडीच राहिली...
Friday, April 15, 2011
प्रेमाची जादू
कुणीतरी आपल्यावर प्रेम करतय,
कुणालातरी आपली ओढ आहे ,
हि कल्पनाच किती सुंदर,
हि जाणीवच किती गोड आहे...
हा तर वियश तर फारच चांगलाय,
पण काहींनाच तो लाभलाय...
प्रेमाची अपेक्षा अन इच्छा सार्यांनाच असते,
फक्त एका नशिबाची गरज तेवढी भासते...
मग तर काय!!!! हात तिचाच हाती हवा,
ग्रीष्मातला भानू देखील फक्त देतो गारवा...
सर जग मागे राहत, असतो आपणच राजा अन ती आपली राणी,
ओठांच तर ठाऊक नाही पण मन नक्कीच गात गोड गोड गाणी...
प्रेमात साजन अन साजणी,
असतात या प्रेमरसात न्हाउनी...
मग असते तीच लोचनी,
कधी रंगुनी तर कधी लाजुनी...
म्हटल स्वतला...
माहितीये या प्रेमाच्या नादात अनेक बुडाले रे,
या प्रेम अग्नीत असंख्य जीव जाळले रे,
तर म्हणतो कसा...
विसर झाले गेले सख्या रे,
प्रेम झालाय आता तुला रे...
पण करणार तरी काय???
प्रेमाची जादूच भुरळ घालणारी आहे,
अन प्रेमाच्या या दुनियेत नेहमीच एकाची भर पडणार आहे...
me ka radat nihi...
अश्रूंची तर गोष्टच वेगळी आहे...
डोळ्यात असतील तर पाणी,
अन ओघळले तर निर्माल्य आहे...
अश्रू नेहमीच विवश करतात,
कधी भांडतात तर कधी हात धरतात...
डोळ्यातला एकेक अश्रू खाली पडला
कि थेट काळजात दुखत
कारण अश्रुंचे कारण असणाऱ्या व्यक्तीच घर
या काळजातच असत...
तिच्या आठवणीत हे मन कावरत,
उगाचच मग ये उनाड होऊन बावरत,
लगेचच मनाला लगाम घातली जाते,
कधी समजावून तर कधी धमकावून
त्याला शांत केले जाते...
या पडणाऱ्या अश्रूंना मग हे मनच स्वतः आवरत,
कारण...
आठवणी सांडून संपतायत कि काय
या जाणिवेनेच मन घाबरत ....!!
Saturday, April 9, 2011
दुरावा
"काही नाती तुटता तुटत नाहीत,जेवढा प्रयत्न तोडण्याचा तेवढीच जास्त अतूट बनतात,जेवढा दुराव्याचा प्रयत्न,ती तेवढीच जवळ येऊ लागतात ...
का पण हे असच होत?
त्यामुळेच हे मन अधिकाधिक गुंतत जात,
कितीही आवळून धरल तरी ते सुटूनच जात.
का जवळची व्यक्तीच मोठी जखम देऊन जाते,
तरीही हे वेड मन तीच व्यक्ती परत येण्याची वाट पाहते.
त्या जखमेचा इलाज तीच व्यक्ती करू शकते,
म्हणूनच वाटत "हे मन" वेड्यागत वागते.
नाही खर का बर तुटत नाही?
मन हे का नात्यांशिवाय जगू शकत नाही...?
जिला विसरायचं असत तीच जास्त आठवते,
मन हे वेड अबोल क्षनातही तिच्याच आठवणी साठवते...
दुरावा देखील मनांना दूर करू शकत नाही,
कितीही दूर केलं तरी मनातून तर ती कधीच जात नाही...
सातत्याने तिचाच विचार मनात भिनलेला असतो...
त्याच विचार मन आकंठ डूबलेला असतो...
त्यामुळेच दुराव्याचे सारे प्रयास फसतात,
अन ज्यांना दूर करावे ते अजून जवळ येऊ लागतात...
का पण हे असच होत?
त्यामुळेच हे मन अधिकाधिक गुंतत जात,
कितीही आवळून धरल तरी ते सुटूनच जात.
का जवळची व्यक्तीच मोठी जखम देऊन जाते,
तरीही हे वेड मन तीच व्यक्ती परत येण्याची वाट पाहते.
त्या जखमेचा इलाज तीच व्यक्ती करू शकते,
म्हणूनच वाटत "हे मन" वेड्यागत वागते.
नाही खर का बर तुटत नाही?
मन हे का नात्यांशिवाय जगू शकत नाही...?
जिला विसरायचं असत तीच जास्त आठवते,
मन हे वेड अबोल क्षनातही तिच्याच आठवणी साठवते...
दुरावा देखील मनांना दूर करू शकत नाही,
कितीही दूर केलं तरी मनातून तर ती कधीच जात नाही...
सातत्याने तिचाच विचार मनात भिनलेला असतो...
त्याच विचार मन आकंठ डूबलेला असतो...
त्यामुळेच दुराव्याचे सारे प्रयास फसतात,
अन ज्यांना दूर करावे ते अजून जवळ येऊ लागतात...
ti an to
ती...
बस मला आता तुझ्यावर मुक्त प्रेम करायचय
तुझ्या श्वासांबरोबर तुझ्या आत शिरायचय
जग पुढे जाऊ ,मागे जाऊ,नाहीतर तिथेच राहू
मला फक्त तुझी सावली बनून जगायचय...!!
तो...
काग तू फक्त सांगतेस करत कधीच नाही
आस लावते येण्याची पण भेटत कधीच नाही.
खरच तूच कारण मला जिवंत ठेवण्याचे,
आणि तुझे ते आश्वासन, नेहमीच मला झुलत ठेवतात.
"म्हणतेस मुक्त प्रेम करायचं", मग इतका उशीर का?
नाही परवा जगाची, तरीपण इतका संकोच का?
स्वासातून तू आत शिरलीय यात शंकाच नाही,
आता तर हृदयात तू सोडून कुणीच उरत नाही.
माहितीय तुझ प्रेम आहे, यात दुमत नाही,
पण सावली बनून राहशील याच्याशी मी सहमत नाही.
सावली तर अंधारात सोबत सोडून जाईल,
तू सोडून गेलीस तर मी जिवंत कसा राहील???
तू तर माझे स्पंदन आहेस हृदयात माझ्या वसणारे,
ज्याच्याशिवाय मी, माझ्याशिवाय ते नसणारे...
भेट
एकमेकांना न भेटता, अगदी न पाहता
प्रेमाच जणू व्रतच घेतलय
एकमेकांसाठीच जगण्याच बहुतेक
त्यांनी आपल्या मनावर घेतलय ............!!....
all about only night but now see about day...
दिवसाची तगमग तर पाहताच दिसते,
माहितीय भेटू शकत नाही तरी त्याला अपेक्षा फार असते...
प्रयत्न फार करतो रात्रीला भेटण्यासाठी,
किती तो तरफडतो तिला एकदा पाहण्यासाठी...
सांज येताच त्याच्याकडे प्रेम संदेश सोडतो,
कोणास ठाऊक रोजच काय निरोप लिहतो.
निरोप देतांना हलवा तो होतो,
त्या हलवेपनामुळेच आभाळाला लालसर रंग येतो.
थकत मात्र नाही,माहितीय निरोप रात्र पण सोडणार आहे,
म्हणूनच दिवसही काहीसा पहाटेला शोधणार आहे.
तीच तर आहे मैत्रीण रात्रची जी निरोप आणणार आहे.
तो निरोप वाचायसाठी बिचारा दिवस रात्रभर जगणार आहे.
अस नाही कि दिवसाला रात्रीची काळजी नाही,
असाही नाही का रात्रीसाठी तो काहीच करत नाही.
माहितीय त्याला रात्रीला अंधाराची भीती वाटते,
अंधारा समोर येताच तिची हिम्मत आटते.
दिवसाने यावरही एक उपाय काढलाय,
म्हणूनच त्याने चंद्राला स्वतःचा प्रकाश दिलाय.
चमकत तर चंद्र असतो मात्र प्रकाश हा दिवसाचा,
एक साधा प्रयत्न रात्रीला स्वतःचा प्रकाश देण्याचा.
माहितीय अमावास्येला चंद्र दिसत नाही,
म्हणूनच दिवसाला त्या दिवशी मुळीच उसंत नाही,
दिवस भर बसून मोठ्ठा संदेश लिहतो,
संदेश वाचण्यातच रात्रीचा वेळ निघतो.
मान्य आहे रात्रीला दिवस भेटू शकत नाही,
पण तिची काळजी करण्यात तो मुळीच थकत नाही.
तिच्यासाठीच त्याने पूर्ण आयुष्य दिलाय,
कारण तिच्या अस्तित्वानेच तर त्याच्या असण्याला अर्थ दिलाय.
स्पर्धा
तो अन ती...
काळ आणि वेळ जन्च्याहून जून एक भांडण आजही सुरूच आहे,
तो सरस का ती हे ठरावान म्हणजे खर तारेवरची सर्कसच आहे.
तो तो आहे अन ती ती आहे,
मग दोगेही का एकमेंकाशी स्पर्धा करत आहे???
अन स्पर्धाही अगदीच निराळी अन जगावेगळी,
त्या स्पर्धेची नियमावली अन उत्तराची भाषाही आगळीवेगळी.
सगळ्यात महत्वाच म्हणजे दोघांच अस्तित्व एकमेकांवाचून काहीच नाही,
तरी पण दोघांपैकी एकालाही हि साधी गोष्ट पटत नाही व मुळी मान्यच नाही.
काळ आणि वेळ जन्च्याहून जून एक भांडण आजही सुरूच आहे,
तो सरस का ती हे ठरावान म्हणजे खर तारेवरची सर्कसच आहे.
तो तो आहे अन ती ती आहे,
मग दोगेही का एकमेंकाशी स्पर्धा करत आहे???
अन स्पर्धाही अगदीच निराळी अन जगावेगळी,
त्या स्पर्धेची नियमावली अन उत्तराची भाषाही आगळीवेगळी.
सगळ्यात महत्वाच म्हणजे दोघांच अस्तित्व एकमेकांवाचून काहीच नाही,
तरी पण दोघांपैकी एकालाही हि साधी गोष्ट पटत नाही व मुळी मान्यच नाही.
Subscribe to:
Posts (Atom)

