तुझी आठवण...

तुझी आठवण...

Tuesday, September 20, 2011

पण प्रेमात तर पडलो, कळत नकळत...


मित्र आमचा जवळचा,

नेहमी आमच्यात राहिलेला...

सुखात असो वा दुख्खात

त्याला कवळून पाहिलेला...

विचारलं त्याला “अस काय झाल की तू बदलत चाललाय...

तुझ्यातला तू आता तर फारच कामी राहिलाय”...

म्हणाला एकदम आवर्जून...

“आमच्यात तस काही नाही...

फक्त मैत्री नाही अजून जराही काही”...

सकाळ संध्याकाळ त्याची सोबत जाई...

सोमवार वा रविवार त्याला जराही वेळ नाही...

दिसतंय मला तू अन् तिची होते लाही लाही...

तरीही म्हणतो आमच्यात काहीच नाही???

मान्यय मला आहे हा नवीन जमाना....

आम्हीही त्यातलेच काय सांगतो बहाणा???

मज्जा वाटते तुम्हा दोघांना एकत्र पाहतांना...

चोराच तर ओळखतात दुसऱ्या चोरांना...

इतक सांगितल्यावर भाऊ जरासे पिघळले...

हळू हळू का होएना सारेच कबलले...

“अरे मनात तर कधीच नव्हत मैत्रीपुढे जाण्याचं...

पण शक्यच नाही मला स्वतःला तिच्या विन्या पाहण्याचं...

आल नात या जागेवर,

कधी पळत तर कधी वळत...

पण प्रेमात तर पडलो,

कळत, न-कळत”...

Facebook Badge