तुझी आठवण...

तुझी आठवण...

Sunday, June 12, 2011

ek prayant...

का कळल नाही कधीच ,

तू माझा नव्हतास ,

जाणीवही तूच करून द्यावी ,

इतक का निष्ठूर वागलास ,...!!

तरीही मनाची अजून लाही ,

चुरगळलेली स्वप्न

नीट करून पाही .....!!

भ्रमात होते मी ,तसच राहून द्याय्चस

जवळ यायचं नव्हत तर दुरूनच पहाय्चस ,

स्वप्न माझी अनमोल होती

वरवर नाही तर सखोल होती ,..!!

भावनांनी भरलेल,हळव नात होत

बहुतेक हेच सगळ तुला नको होत .

चुकले का मी कुठे ,हाच प्रश्न पडतोय

नसेन कदाचित ,पण तोल मात्र जातोय ....!!
sagar chitte - छान लिहलय... पण ऐकलंय मी कुठतरी...
प्रेमात सार काही माफ असतं,
समोरच्याच मन कसाही असो आपलं मात्र साफ असतं...

आणि तू काही करार केलेला त्याच्याशी कि तुझाच होऊन राहील?
हे तर त्याच मत तो सोबत देईन किव्वा निघून जाईल...

जे आठवून त्रास होतो ते तर प्रेम असूच शकत नाही,
कारण प्रेम कधीच प्रेम करणाऱ्यांना त्रस्त पाहू शकत नाही...

त्रास करून घेतेस ते अपेक्षांमुळे, स्वतःच्या कल्पनांमुळे,
अन् मग म्हणते त्रास होतोय तो तुझ्याच प्रेमामुळे...

क्षणभंगुर का होईना प्रेम तू केलंल,
नशिबाने ते तुझपर्यंत आलेलं...
अनेक तर जगतात अन् मारतात प्रेमाच्या नावही न ऐकता,
मग आपण ते अनुभवूनही का नेहमीच फक्त अन् फक्त रडता...

स्वप्न तू पहिली मग तो कस काय त्यांना चुरगळतो?
त्याच्या जाण्याने तुझ्या प्रेमात काय फरक पडतो?
फक्त बरोबर असणंच प्रेम आहे तर सहवास काय?
अस असेल तर प्रेमात आणि सोबतीत फरक तरी काय???

तुझं मन तुला वाटल म्हणून तू त्याच्यात गुंतवल,
मग का म्हणते त्याने तुला फसवलं???

भावनांनी भरलेल,हळव नात होत
ते तुझ्या मनाने स्वतः बनवलं होत,
त्याला सांभाळायची जबाबदारी तुझी आहे,
मग काहून तू दुसऱ्या व्यक्तीची त्यासाठी वाट पाहे???

मान्याय प्रेम आयुष्याच्या महत्वाचा भाग आहे, पण आहे तर भागच ना???
अन् जो सोडून जाऊ शकतो अश्या नात्याला त्यालाही तू प्रेम केलच ना???
मग आता का उगाच स्वतःला आणि प्रेमाला त्रास देतेस???
एका चुकीच्या निर्णयामुळे प्रेमाला का नाव ठेवतेस???

प्रेम तर होईल पुन्हा नक्कीच माझा अनुभव आहे,
कारण तुझ्यातला सगळ्यात चांगला गुण तुझा स्वभाव आहे...

Facebook Badge