तुझी आठवण...

तुझी आठवण...

Wednesday, November 23, 2011

सांग माणसा तुज काय हवे???


सांग माणसा तुज काय हवे…बोलायला सार काही आहे...
पण बोलायला तुला वेळ कुठ आहे??? 
 

बोलाल्याविना
 ही भावना मुकच ना 
कितीही असल तरी तुला अजूनही भूकच ना???

संग
 माणसा तुज काय हवे... 
फुल तर बनवली हजार रंगागंधाची...
पण बघायलाच, सुगंध लुटायचा तुला वेळ कुठ आहे???
 

सुगंधाशिवाय फुलांचं जगण व्यर्थ ना
सुख म्हणजे सगळ असण हाच तुझा अर्थ ना???

तुज काय हवे काय हवे 
गरजा, आशा वाढतात ना 
पण आशा करतांना कर्तव्यांची चिंता तुला आहेच कुठ???

गरजेपुढे
 असे ठेन्गने वाटतात हि नाती ना
अर्थच विसरला जगण्याचा मग सुखाचा अर्थच तू विसरला ना???
सांग ना तुज काय हवे काय हवे 
पक्षी जरी गगनावरी रोज विहरति 
सांज होता घरी ते परतती...
तूला घराचा अर्थ तरी लक्षात आहे का???
अरे सगळ तर आहे, मग सारा सुखाचा हव्यास का???

Facebook Badge