तुझी आठवण...

तुझी आठवण...

Saturday, April 9, 2011

भेट

एकमेकांना न भेटता, अगदी न पाहता
प्रेमाच जणू व्रतच घेतलय
एकमेकांसाठीच जगण्याच बहुतेक
त्यांनी आपल्या मनावर घेतलय ............!!....
all about only night but now see about day...

दिवसाची तगमग तर पाहताच दिसते,
माहितीय भेटू शकत नाही तरी त्याला अपेक्षा फार असते...
प्रयत्न फार करतो रात्रीला भेटण्यासाठी,
किती तो तरफडतो तिला एकदा पाहण्यासाठी...

सांज येताच त्याच्याकडे प्रेम संदेश सोडतो,
कोणास ठाऊक रोजच काय निरोप लिहतो.
निरोप देतांना हलवा तो होतो,
त्या हलवेपनामुळेच आभाळाला लालसर रंग येतो.

थकत मात्र नाही,माहितीय निरोप रात्र पण सोडणार आहे,
म्हणूनच दिवसही काहीसा पहाटेला शोधणार आहे.
तीच तर आहे मैत्रीण रात्रची जी निरोप आणणार आहे.
तो निरोप वाचायसाठी बिचारा दिवस रात्रभर जगणार आहे.

अस नाही कि दिवसाला रात्रीची काळजी नाही,
असाही नाही का रात्रीसाठी तो काहीच करत नाही.

माहितीय त्याला रात्रीला अंधाराची भीती वाटते,
अंधारा समोर येताच तिची हिम्मत आटते.

दिवसाने यावरही एक उपाय काढलाय,
म्हणूनच त्याने चंद्राला स्वतःचा प्रकाश दिलाय.
चमकत तर चंद्र असतो मात्र प्रकाश हा दिवसाचा,
एक साधा प्रयत्न रात्रीला स्वतःचा प्रकाश देण्याचा.

माहितीय अमावास्येला चंद्र दिसत नाही,
म्हणूनच दिवसाला त्या दिवशी मुळीच उसंत नाही,
दिवस भर बसून मोठ्ठा संदेश लिहतो,
संदेश वाचण्यातच रात्रीचा वेळ निघतो.

मान्य आहे रात्रीला दिवस भेटू शकत नाही,
पण तिची काळजी करण्यात तो मुळीच थकत नाही.
तिच्यासाठीच त्याने पूर्ण आयुष्य दिलाय,
कारण तिच्या अस्तित्वानेच तर त्याच्या असण्याला अर्थ दिलाय.

No comments:

Facebook Badge