हो दिसतेय "ती" मला सगळीकडे,
अन सगळे म्हणतात "तू फार पाहतो सार्या मुलींकडे".
काय करू मी???
कुणीच्या नजरेतून बघते ती,
तर कुणाच्या गालातून हसते ती,
कुणाच्या केसांमध्ये तिची आठवण,
कुणाच्या बोलण्यात तिच्या पद्धतीची साठवण...
कधी उगाचच हक मारतो मागून,
अन कधी कधी येत पण नाही सांगून.
कुणाच्या ओढनीतून उगाच मला चिडवते,
तर कधी सावली बनून माझा रस्ता अडवते...
मी तरी काय करू ? माझी चूक नाही यात
ती अन तीच दिसते मला सगळ्यात...
त्यामुळे डोळे न उघडण्याचा विचार केला,
मनातही तिच्या छबिने तोही गारद केला.
स्वप्न अन सत्य यात जागाच उरली नाही,
मी तरी काय करू "तीन" सोडलेली पोकळी कधीच भरली नाही....


No comments:
Post a Comment