तुझी आठवण...

तुझी आठवण...

Saturday, April 9, 2011

ti an to

ती...
बस मला आता तुझ्यावर मुक्त प्रेम करायचय
तुझ्या श्वासांबरोबर तुझ्या आत शिरायचय
जग पुढे जाऊ ,मागे जाऊ,नाहीतर तिथेच राहू
मला फक्त तुझी सावली बनून जगायचय...!!

तो...
काग तू फक्त सांगतेस करत कधीच नाही
आस लावते येण्याची पण भेटत कधीच नाही.

खरच तूच कारण मला जिवंत ठेवण्याचे,
आणि तुझे ते आश्वासन, नेहमीच मला झुलत ठेवतात.

"म्हणतेस मुक्त प्रेम करायचं", मग इतका उशीर का?
नाही परवा जगाची, तरीपण इतका संकोच का?

स्वासातून तू आत शिरलीय यात शंकाच नाही,
आता तर हृदयात तू सोडून कुणीच उरत नाही.

माहितीय तुझ प्रेम आहे, यात दुमत नाही,
पण सावली बनून राहशील याच्याशी मी सहमत नाही.

सावली तर अंधारात सोबत सोडून जाईल,
तू सोडून गेलीस तर मी जिवंत कसा राहील???

तू तर माझे स्पंदन आहेस हृदयात माझ्या वसणारे,
ज्याच्याशिवाय मी, माझ्याशिवाय ते नसणारे...

No comments:

Facebook Badge