आज चक्क पाऊस पडला,
पण नाही भिजलो आज पावसात,
ती न्हवती, मी तरी काय करणार....
पाऊस हलकेच कानात सांगून गेला
अरे वेड्या एप्रिलमध्ये मी येतोय काहीतरी तर कारण असणार ना,
मी म्हटल खर बाबा तुझ, पण एकता भिजलो तर ती माझ्यावर रुसणार ना...
या वाक्यावर तो हसला अन उत्तरला,
तिथ तीही हेच म्हणाली,
अन तुमच्या या दुराव्यात,
माझीपण भिजायची इच्छा कोरडीच राहिली...


No comments:
Post a Comment