काहीतरी बिनसलंय पण तो काही सांगत नव्हता,
रात्री तर तो विचित्र वागत होता,
आकाशातले ते चंदेरी तारे,
संथ वाहणारे ते गार गार वारे,
कशाकडेच त्याचे लक्ष नव्हते...
मनाच्या कोपर्यात तो रडत होता,
चिंतेचे डोंगर एकाकीच चढत होता...
सकाळीपण काही सुधार न्हवता त्याच्यात
आज तर होत शेवटच lect वर्गात,
pl लागली,
सारे खुश झाले, अभ्यासाला वेळ मिळणार
या रोजच्या कॉलेज life पासून सुटका होणार...
तो मात्र नाराज होता,
कुणाशीच काही बोलत न्हवता,
स्वतःच काहीतरी पुटपुटत होता,
आतून खोलपर्यंत तुटत होता.
परीक्षेला घाबर्नार्यांपैकी तो नव्हता,
कॉलेज कार्नार्यान्पैकीपण तो नव्हता...
मग नेमक प्रोब्लेम तरी काय???
ती...
आता समजल घोड कुठ अडलं ते,
लक्षात आल त्याच गणित कुठ भीडल ते...
pl मध्ये ती दिसणार कशी त्याला???
दिसली नाही ती तर झोप येणार कशी याला???
मोठा यक्ष प्रश्न पुढे आला,
त्यामुळेच तर हा उंट डोंगराखाली आला,,,
lect मध्ये जायचं कारणच ती होती,
साहेबांसाठी पुस्तक अन वहीपण तीच होती...
फोन तरी किती वेळा करू??? प्रश्न मोठा मनात
अहिल्यान्दाच अनुभवल अस बिचार्याने जीवनात...
काय करू कळत नाहीये त्याला,
एक साध कारणही सापडत नाहीये बिचार्याला...
हताश तो झाला , शेवटी वीचार करून थकला,
मन खाली घालून शेवटच्या बेंचवर जाऊन बसला...
तितक्यात...
"मला mis समाजात नाही रे, मदत जरा करशील का?
जास्त नाही पण एक तास रोज येऊन सांगशील का?"
तीन जवळ येऊन स्वतः विचारलं,
त्याच मन ऐकताच क्षणात तरारलं...
अशक्य शक्य झाल होत,
पण हे तिथच थांबल नव्हत...
"नक्कीच, पण मलाही थोडी मदत हवी आहे,
finance मला 40 वर का होएना पण काढायचा आहे"...
त्याने मनुष्य वृत्ती दाखवली,
भेटत ते कमीच हि उक्ती चालवली...
"सांगेन मी finance पण तुलाही practice करावी लागेल,
दोन विषय म्हटल्यावर २ तास तरी भेटाव लागेल"...
तिच्या या उत्तरावर तो फार खुश झाला,
भेटू उद्या म्हणून तो रूम कडे निघाला...
हे सर झाल्यावर ती हलकेच हसली,
म्हटली, "मोहिनीच्या सल्ल्यामुळे मी आज वाचली...
तो नसता दिसला तर मी अभ्यास कसा केला असता?
mis तर mis , माझातर finance पण राहिला असता..."


No comments:
Post a Comment