तुझी आठवण...

तुझी आठवण...

Saturday, April 9, 2011

दुरावा

"काही नाती तुटता तुटत नाहीत,जेवढा प्रयत्न तोडण्याचा तेवढीच जास्त अतूट बनतात,जेवढा दुराव्याचा प्रयत्न,ती तेवढीच जवळ येऊ लागतात ...

का पण हे असच होत?

त्यामुळेच हे मन अधिकाधिक गुंतत जात,
कितीही आवळून धरल तरी ते सुटूनच जात.

का जवळची व्यक्तीच मोठी जखम देऊन जाते,
तरीही हे वेड मन तीच व्यक्ती परत येण्याची वाट पाहते.

त्या जखमेचा इलाज तीच व्यक्ती करू शकते,
म्हणूनच वाटत "हे मन" वेड्यागत वागते.

नाही खर का बर तुटत नाही?
मन हे का नात्यांशिवाय जगू शकत नाही...?

जिला विसरायचं असत तीच जास्त आठवते,
मन हे वेड अबोल क्षनातही तिच्याच आठवणी साठवते...

दुरावा देखील मनांना दूर करू शकत नाही,
कितीही दूर केलं तरी मनातून तर ती कधीच जात नाही...

सातत्याने तिचाच विचार मनात भिनलेला असतो...
त्याच विचार मन आकंठ डूबलेला असतो...

त्यामुळेच दुराव्याचे सारे प्रयास फसतात,
अन ज्यांना दूर करावे ते अजून जवळ येऊ लागतात...

No comments:

Facebook Badge