तुझी आठवण...

तुझी आठवण...

Wednesday, March 30, 2011

tichyasathi...

"गरज,अपेक्षा....हे शब्दच नसावेत प्रेमात ..
फक्त तू..अन,मी ...मी अन,तू...दोघानीच असावं त्या जगात"...

गरज तर असणारच तिच्या सहवासाची,
तिच्या त्या सुमधुर आवाजाची...
गरज का नसावी? कारण सापडत नाही,
तीच तर आहे जिच्याशिवाय माझ पानही हलत नाही...
एकदा पाण्याशिवाय जगू शकतो, पण तिच्या शिवाय नाही,
सांगितल न आधीच तिच्याशिवाय माझ पानही हलत नाही...

अपेक्षा तर ठेवणारच हक्कय तो माझा,
करू तरी काय विचार करतो फक्त तिचा...
तसं अपेक्षा कोणतीच "ती" अपूर्ण ठेवत नाही,
अनेकदा तर मलाही विश्वास बसत नाही,
जे हवाय मला ते मागण्याआधीच देते,
मन मात्र हे वेड, पुढची अपेक्षा तयारच ठेवते.

फक्त तू... हे शब्दच मुळी चुकीचे जाणवतात,
कारण माझ्या "तिला" ते फक्त संबोधतात,
हा... ती समोर नसतांना मन कशातच लागत नाही,
ती असतांना कोणाचीच गरज भासत नाही...

खर सांगू तर तिला मी शोभत नाही,
पण करू तरी काय तिच्या वाचून माझ भागात नाही...
सवय म्हणा वा गरज तिच्याशिवाय मी जगू शकत नाही,
तिला मात्र मी दुख्खी पाहू शकत नाही.
सुखासाठी तिच्या, मी वाट्टेल ते करणार,
काहीही झाल तरी तिचाच हात मी धरणार.

दोघानीच असावं त्या जगात अस तीच मत नाही,
कारण घरचे अन मित्र यांशिवाय तिला होत नाही.

काय झाल कुणास ठाऊक अचानक ति बदलली,
"तूच आयुष्यातला problem " मला ति म्हणून गेली.
असू देत... तिला सुखी पाहून मीपण सुखी राहतो,
म्हणूनच एका वर्षापासून "तिला" दुरूनच मी पाहतो.

गरज सवय अपेक्षा सर फार छोट आहे माझ्यासाठी,
बोललो होतो न आधीच " वाट्टेल ते करणार तिच्या सुखासाठी"...

No comments:

Facebook Badge