जगायला शिकवले तू
वागायला शिकवले तू
असच सतत शिकवशील ना?
आयुष्याच्या प्रवासात .......साथ देशील ना?
तूच आरंभ दिवसाचा
तूच प्रसाद नवसाचा
तूच माजी प्रेरणा
तू अकल्पित कल्पना
नेहमी तूच राहशील ना?
आयुष्याच्या प्रवासात .......साथ देशील ना?
भेटायला बोलावणार
स्वतःच उशीर करणार
स्वतःच नंतर रुसणार
एक झटक्यात रुसवा सोडणार
सदा आशीच राग सोडशील ना?
आयुष्याच्या प्रवासात .......साथ देशील ना?
बोलायला आवडत
ऐकायला आवडत
गप्पा गोष्टी करत झगडायला आवडत
हलके हलकेच मग बिगडायला आवडत
बिगडल्यावर मी खुदकन हसशील ना?
आयुष्याच्या प्रवासात .......साथ देशील ना?
दोघ होतो प्रेमात
प्रेमाच्या सागरात
दोघांच आयुष्य
दोघांच भविष्य
दोघांच नाही आपल म्हणशील ना?
आयुष्याच्या प्रवासात .......साथ देशील ना?
मानतो मी,
चुकतो मी
फसतो मी
अनेकदा नव्हे बर्याचदा
पडतोही मी
चुकातांना पडतांना पकडशील ना?
आयुष्याच्या प्रवासात .......साथ देशील ना?
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment