तुझी आठवण...

तुझी आठवण...

Sunday, March 27, 2011

त्याचं साधं सोप्पं गणित...

त्याचं साधं सोप्पं गणित...
तो तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा
सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा

त्याचं साधं सोप्पं गणित...
न कुणाशी बोलायचं
न कुणाच ऐकायचं

पण काहितरी बदलतयं…
त्याचं साधं सोप्पं गणित कुठतरी चुकलंय...

त्याला नाही जमत आता एकट राहण
उगाच चिडून जगाकडे पाहन
कुणाची तरी ओढ त्याला लागलीय
कुणाचीतरी साथ त्यान जगलीय
त्याचं साधं सोप्पं गणित... कठीण आता झालाय
त्याला कुणीतरी आपलंस मिळालाय...

स्वतःचाच नाई दुसर्याचा विचार तो करू लागलाय...
का कुणास ठाउक??? एकट्यातही तो हसू लागलाय...
विचारात रात्र तो जागू लागलाय...
घाव आणि वेदना हळू हळू का होएना ... पण विसरू लागलाय...
त्याचं साधं सोप्पं गणित... सुटू आता लागलंय
हे जग आता त्याला आपलंस वाटू लागलंय...

त्याचं साधं सोप्पं गणित...
गणिताचा गाभा त्याला कळलाय...
त्यामुळेच तो एकटेपनातून सोबतीकडे वळलाय...
सूत्र आणि प्रमेय दूर त्याने केलीत...
झुलतोय तो आता प्रेमाच्या वेलीत...

त्याचं साधं सोप्पं गणित...गणित राहील नाहीये...
वजाबाकी अन भागाकार त्यात उरले नाहीये...
बेरीज हेच एक समीकरण त्याला आता समजतंय...
त्याचं साधं सोप्पं गणित... त्यालाच आता उमगतंय...

No comments:

Facebook Badge