प्रीतीच्या फुलपाखरा ......
किती ग सुंदर कुणी असते???
तुझ्या समोर सर जग ठेनगे वाटते...
त्या पंखांना तर उपमाच नाही...
नेहमीच मी त्यांना पाहत राही...
कमाल आहे या टपोर डोळ्यांची... किती बोलतात ते
पण खरच खूप बोलतात ग तुझे डोळे
अस वाटत ऐकाव त्याचं कि बघव त्यांच्याकडे
ते बोलक स्वरूप घेऊन जात मला प्रेमाच्या असमानाकडे...
तू रुसलीस कि मग ते मला छळतात
तू हसलीस कि मग ते मला हसवतात,
आपण भांडलो कि ते खूप रडतात
भांडणात मी हसलो कि ते खूप ओरडतात
नेहमीच सांगतात मला...
"जप तुझ्या प्रेमाला...
जप तुझ्या प्रेमाला मर्यादेहून जास्त
नसेल मग तुझ्या दिवसात सूर्यास्त"...
सुचवलाय त्यांनीच... तुला सांभाळायला
तुला सांभाळतांना स्वतःच घसरायला...
घसरल्यावर तुला बोलवायला
प्रथम पंखात, मग मिठीत लपायला...
त्यांच्याच आदेशावरून फुल झालोय...
जग भर फिरणारा मी आता स्तीरावलोय...
वाट पाहतोय...
एक दिवस नक्की तू येशील, प्रीतीच्या फुलपाखरा
तूच माझ्या जीवनाला अर्थ देशील
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment