तुझी आठवण...

तुझी आठवण...

Sunday, March 27, 2011

मन हे माझे तिथेच राहून गेले.


म्हणतात लहानपणी काही समजत नाही,
पण मी या मताशी सहमत नाही.

सहावीच्या इयाक्तेत धडकली ती,
"भेटलोय का या पूर्वी?" म्हटली ती.

त्या क्षणात मी सारे विश्व पहिले,
मन हे माझे तिथेच राहुन गेले....

भेटायचा तिला प्रयत्न करू लागलो,
त्या नादात थोडा का होएना सुधरू लागलो.

ज्या स्पर्धेत ती तिथ मी जाऊ लागलो,
तिच्या नजरेत येण्यासाठी उत्तर देऊ लागलो.

अस करता करता मार्क्स मिळू लागले,
परत अचानक दैव मिस्कील हसू लागले.

तिचा नंबर न येता माझाच आला,
बोलली मला ती जरा जवळ येता
"फार बर वाटलं तुझ्या नम्बरच ऐकून"
बघत होतो मी हे आ वासून...
काय बोलाव हे सुचलंच नाही,
तिच्या डोळ्यातील पाणी अन मनपूर्वक सुभेच्छा...
दोन भवनातील मोठी कोणती समजलीच नाही...

तिच्या या मोठेपणाने घायाळ केले,
मन हे माझे तिथेच राहून गेले.

पण म्हणतात ना जे हवंय ते मिळत नाही,
"ती" कशी सोडून गेली हेच मला काळात नाही.

असो आठवणींची जंगल तिने दिले,
त्या एक एक क्षणांत, मन हे माझे तिथेच राहून गेले.,,...

No comments:

Facebook Badge