एक क्षण असतो ...
तो पण एक क्षण असतो
आईचा मार खायचा,
मार खातानाही हसायचा...
तो पण एक क्षण असतो
शाळेत न जाण्यासाठी पोट दुखवायचा
अन औषध दिसताच शाळेकडे निघण्याचा...
तो पण एक क्षण असतो
घसरगुंडीसाठी लायनित उभ राहायचा
मारामारी करत शर्ट फाडून घायचा...
तो पण एक क्षण असतो
पहिला crush अनुभवायाचा
पहिला नंतर दुसरा शोधायचा...
तो पण एक क्षण असतो
आयुष्यातला पहिला निर्णय घायचा
पूर्ण आयुष्याचा डाव मित्रांसाठी खेळायचा...
तो पण एक क्षण असतो
प्रेमात पडण्याचा
पडण्याचा नाई तर आपटण्याचा...
तो पण एक क्षण असतो
वाट पाहण्याचा
ती येईल म्हणून तासंतास थांबण्याचा...
तो पण एक क्षण असतो
तिला propose करण्याचा
एका क्षणात पूर्ण जीव ओतण्याचा...
तो पण एक क्षण असतो
तिच्या वाढदिवशी १२ आधी १ तास गप्पा मारायचा
wish न करताच फोन ठेवायचा...
तो पण एक क्षण असतो
तिच्यासाठी गिफ्ट शोधण्याचा
एक दोन नाई पूर्ण २१ गिफ्ट सापडवायचा...
तो पण एक क्षण असतो
रात्र रात्र जागण्याचा
फोन वर बोलताना क्षणात रात्र घालवण्याचा...
तो पण एक क्षण असतो
तो पण एक क्षण असतो
तिच्या निर्णयाचा
आपण पासून मी अन ती होण्याचा...
तो पण एक क्षण असतो
तो पण एक क्षण असतो
तिने नाही म्हणण्याचा
तो पण एक क्षण असतो
कारण विचारत हजार फोन करण्याचा
अन स्वतःला विचारत राहण्याचा...
तो पण एक क्षण असतो
जगता जगता मरण्याचा
प्रत्येक क्षण मरण्याचा...
तो पण एक क्षण असतो
ती येईल या अपेक्षेत
पूर्ण आयुष्य घालवण्याचा...
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment