तुझी आठवण...

तुझी आठवण...

Friday, May 27, 2011

आम्ही या हिंदुस्तानाचे आदर्श ....

आम्ही या हिंदुस्तानाचे आदर्श ....
आमच्या मुखी भाषा जरी अनेक
पण प्रत्याकाच्या मनात भाव मात्र एक...

सारे राहतात स्वतःच्याच विश्वात
पण साऱ्यांच्या मनातलं गाव एक....

मान्यय आमचे मार्ग आहेत वेगळे
पण तरीही साऱ्या मार्गावरील धाव एक...

जरी पावला पावला वरील भाषा बदलतात
तरीही हरेक मनातील आशा एक...

चंद्रापासून समुद्राच्या खोलीपर्यंत मजल आमची गेलीय,
स्वतःची एक जागा जगाच्या नकाशावर आम्ही बिम्बवलीय...

आजही डोळ्यातून हृदयात पोह्चायचा जीना आहे,
काळ कोणताही असो पण आजही हा जमाना आमचा आहे...

आजही मानतो देव धर्म, करतो दान आम्ही,
राहत झाडांचे अन इमारतींच्या रान आमच्या राज्यात,
आजही करतो मोठ्यांचा अन भावनांचा मन आम्ही....
या विश्वाला मिळालेलं ईश्वरी वरदान आम्ही...

आमच्या कडून शिका नाते कसे जपायचे,
हळुवारपणे हृनानुबंद कसे उमलायचे,
अनोळखीलाही आपलेसे कसे बनवायचे,
जे कुणीही नाही करू शकत ते कसे करायचे,
जगाच्या राहत गाड्यात आपले अस्तित्व कसे टिकवायचे....

काहीही केल तरी आमच्यासारखे आम्हीच निघायचे,
म्हणून म्हणतो आम्हाला हिंदुस्तानचे आदर्श म्हणायचे....

No comments:

Facebook Badge