तुझी आठवण...

तुझी आठवण...

Thursday, May 5, 2011

तिचा सवाल...

ती...
दिसेल का तुला माझ्या मनाची तळमळ काय हवय मला कळेल का तुला कधी ? का जीव लावतेय माझंच मला पडलेल कोड सांगना उलगडेल का हे कोड मला कधी ?


तो...
का ग अस विचारतेस???\
नीट बघ, ते मन तुझ नाही माझ आहे,
ही तळमळ ही तगमग मलाही तितकीच झोंबत आहे...

तुला काय हवं हे मला चांगलाच ठाऊक आहे,
पण मी तरी काय करू, मलाही काळ आणि वेळच बंधन आहे...

तुझ्यासाठीच तर सखी सार हे जग मी सोडलंय,
तरीही का तुला माझच कोड पडलंय ???

जीवन अन मृत्यू तुझ्याच नावे केलंय...
पण काय करू या जगाच्या रह्दारीने मला बेजार बनवलंय...

तुझ आणि माझ भविष्य सुधरवण्यासाठी,
वर्तमान थोडा जळतोय, येणाऱ्या भविष्यासाठी....

तूच तर माझी प्रेरणा तूच तर माझी शक्ती आहेस,
तूच माझी आराधना तूच तर माझी भक्ती आहेस...

तू जीवनाच्या वळणावर साथ माझा सोडू नकोसं...
बाकी काहीही कर पण माझ्या प्रेमावर प्रश्न नको करूस....

No comments:

Facebook Badge