तुझी आठवण...

तुझी आठवण...

Friday, December 23, 2011

"कधी तू"


आला तो दिवस जेव्हा मनातलं तिला सांगणार होतो...
माझाच भविष्य एकतर सावरणार नाही तर पुसणार होतो...

ती समोर आली अन् माझी वाचाच गेली...
“कधी तू” या शब्दांवर माझी गाडीच बंद झाली...

काय उपमा देऊ अन, काय सांगू आता हिला
माधुरी-ऐश्वर्या म्हणू की, म्हणू सरळ मधुबाला

फूल म्हणू की फुलामधला गंध तो आगळा
स्वप्न म्हणू की वास्तवाचा भास् तो वेगळा...

थोड चढवून सांगू की, सरळ स्पष्टच सांगू तिला
बाई ग प्रेम-बिम समजल नाही अजुन, थोडा वेळ दे मला

नाहीतर नकोच ही दुनियादारी, उगीच व्हायची शाळा
आवडल तर ठीक, नाहीतर फसायाचा बेत सगळा...
म्हणूनच... “कधी तू आरशात तोंड पाहिकाय का?” म्हणून चिडवू लागलो...
“काय गरज, तुझे डोळे आहेत ना???” या तिच्या उत्तरामुळे एकटक तिच्याकडे पाहत राहिलो...

No comments:

Facebook Badge