तुझी आठवण...

तुझी आठवण...

Sunday, March 27, 2011

ek kahani

"जग सोबत आहे .. हा फ़क़्त मनाचा खेळ आहे…
अंधारात सोबत द्याला आपल्या सावलीला हि कुठे वेळ आहे …

जगाच्या सोबती वर नको ठेवू विश्वास...
फसवे मृगजळ ते .. नाही शमवणार तुझ्या सोबतीची तहान ..."

हिने वाचून दाखवलं...
त्याला मात्र सोलिड tension आलं...

काहीतरी वेगळय त्याला लगेचच जाणवलं,
नेहमी प्रेमाकाव्यावर हसणाऱ्या "तिला" हे वाक्य कस आवडलं???

हिम्मत करून त्याने विषय बदलू पहिला,
"आज तर छानच शिकवलं सरांनी" तो म्हटला,
तीच मात्र लक्ष तिकडच होत,
जेव्हा त्याला हे जाणवलं, तो मग नंतर शांतच राहिला...

"खरच अस होता का रे?", ती निरागसपणे म्हणाली,
सोप्या, पण खोल प्रश्नाने त्याची हवाच उडाली.

"अग हे सर मनाने लिहतात सगळे", त्याने बाजू सावरली,
त्याच्या या कारणाने ती उगाचच बावरली.

सांगू लागली तिच्या मैत्रिणींचे अनुभव त्याला,
'करू तरी काय?' सुचतच नव्हते याला.

शेवटी यक्ष प्रश्न तिने विचारला,"तुही प्रेमात आहे कारे कुणाच्या?"
प्रश्न ऐकून तोंडचे पाणीच उडाले बिचार्याच्या.

काय सांगू त्याला उमगेनासे झाले,
तितक्यात काहीसे त्याच्या डोक्यात आले.
सांगावे हिला तिची जागा माझ्या मनात,
ती अन तीच हवीय त्याला त्याच्या जीवनात...
पण...
पण..

तिचे वाक्य त्याला आठवले,"फक्त प्रेमाने पोट भारत नाही",
खरच होत तेही,आपला "तो" शिकतोय अजून काहीच कमावत नाही.

मन मारत त्याने स्वतःला सावरले,
ओठांपर्यंत आलले शब्द कसेतरी आवरले.

"प्रेम वैगरे काहीच अस्तिवात नसत",मोठ्या निर्धाराने त्यान सांगितल,
बोलता बोलता तिने अचानक त्याच्या डोळ्यात बघितल,
काय होत ते तिला कळाल नाही,
त्याच्या बोलण्यात अन डोळ्यात साम्य तिला मिळाल नाही.

तिच्याही मनात मग शंकेची पाल चुकचुकली,
क्षणभरा नंतर ती खालीच बसली,
आज त्याच्या बोलण्यात ती नाही फसली,
पण काय करणार तीही,त्याच्या हट्टीपानासमोर तीही थकली.

No comments:

Facebook Badge